Majalgaon Rain Update : राष्ट्रीय महामार्गाला नदीचे स्वरूप | Beed | National highway | Sakal Media
माजलगाव (जि. बीड) : संततधार बरसत असलेल्या पावसामुळे(Rain)आणि राष्ट्रीय महामार्ग असलेल्या खामगाव - पंढरपूर या रस्त्याला नदीचे स्वरूप आले आहे. दुतर्फा नाला नसल्यामुळे पाणी रस्त्यावरून वाहत आहे. बहुतांश ठिकाणच्या दुकानात पाणी शिरले तर वाहनधारकांना यातून वाट शोधावी लागत आहे. त्यामुळे पालिका प्रशासन व लोकप्रतिनिधींच्या विरोधात या पाण्यात बसुन मंगळवारी ता. 7 युवकांनी आंदोलन केले. यावेळी मनोज फरके, रवि गायकवाड, सतिश थोरात, अशोक कुललथे, अमोल कामटे, अमर बजाज यांचेसह व्यापारी उपस्थित होते. दरम्यान आठ दिवसांत नाल्या न केल्यास जलसमाधी घेणार असल्याचा इशारा मनोज फरके यांनी दिला आहे.
#HeavyRain #NationalHighway #Majalgaon #Beed #Marathwadarain